Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

Video : पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नाशिककरांची साथ लाभल्यास भविष्यात कितीही मोठा पाऊस आला किंवा पूर परिस्थिती उद्भवली तरी त्यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

मांढरे म्हणाले, यावर्षी देखील दमदार पाऊस होणार असा अंदाज वेध शाळेने वर्तविला आहे. त्यामुळे भविष्यातील पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका प्रशासन व सिंचन विभागाची उत्तम तयारी आहे. परंतु नागरिकांनी देखील पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वतयारी करावी.

- Advertisement -

नदीपात्रालगतच्या नागरिकांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. जनावरांसाठी सुरक्षित जागा निश्चित करणे, धान्यांचा साठा सुरक्षित ठिकाणी साठविणे, आदीबांबत पूर्वकल्पना देण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठी धरणे आहेत. नदीकाठापर्यंत वस्ती असल्याने मागील वर्षाच्या अनुभवानुसार पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्कृष्ट असा कृती आराखडा तयार केला आहे.

इथे पहा व्हिडिओ :

जवळपास ६० ते ७० वर्षामधला सगळ्यात मोठा विसर्ग २ लाख क्युसेक नांदूरमध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आला होता. परंतु विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट समन्वय व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कुठलीही जिवितहानी किंवा प्राणीहानी झाली नाही. यंदाही त्याप्रमाणेच समन्वय ठेवण्यात आला आहे.

यासाठी तयार करण्यात आलेला लघूकृती आराखड्यामध्ये प्रत्येक विभागाची काय जबाबदारी राहील, अतिवृष्टीप्रसंगी संपर्क कोणी आणि कसा करायचा व काय काम करायचे याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले अाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या