त्र्यंबकेश्वर तालुका कृषी कार्यालयामार्फत बियाणे व खते वाटप सुरू
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर तालुका कृषी कार्यालयामार्फत बियाणे व खते वाटप सुरू

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : लॉकडाऊनचा काळ लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या सोयी साठी त्र्यंबकेश्वर तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर भात बियाणे व खते शेतकरी गटा मार्फत उपलब्ध करून दिले जात आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात १०७ शेतकरी गट कार्यरत झाले आहे.
खरीप हंगामाकरिता शेतकरीवर्गासाठी तालुका कृषी कार्यालय सज्ज झाले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली आहे.

करोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना योग्य किमतीत सहजगत्या बियाणे व खते उपलब्ध करून द्यावी. बांधावर बियाणे या कृषी मंत्र्याच्या संकल्पनेनुसार लॉकडाऊन काळात बाजारातील गर्दी कमी होण्यास व शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यास मदत झाली आहे.

१० क्विंटल भात बियाणे वाटपचे उद्दिष्ट असून नुकतीच खरवळ या अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागात बियाणे व खते वाटप उपक्रमाचा शुभारंभ झाला. कृषी सहाय्यक आबासाहेब आटोळे यांनी शेतकऱ्यांचा मदतीने ३२० गोण्या शेती बांधावर उपलब्ध करून देण्यात आल्या.

या वाटपप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, मंडल कृषी अधिकारी अनिल गावित, कृषी पर्यवेक्षक आबासाहेब आटोळे, संदीप पठारे, कृषी सहाय्यक यशवंत शेवरे
सुभाष मौळे, उत्तम मौळे व अन्य शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेहडपाडा, बोरीपाडा, चिंचोओहळ या भागात बियाने व खते वाटप झाले. यात युरिया, डीएपी, एसएसपी ही खते व इंद्रायणी दप्तरी होम ३ या भात बियाणांचे वितरण शेतकरी गटामार्फत केले जाते.
– संदीप वळवी, त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com