Friday, April 26, 2024
Homeनाशिकअनुसूचित जातीच्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’ मार्चअखेरपर्यंत वितरण

अनुसूचित जातीच्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’ मार्चअखेरपर्यंत वितरण

नाशिक । राज्यात सन 2019-20 या वर्षामध्ये 11 फेब्रुवारीपर्यंत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप प्रतिपूर्ती योजनेंतर्गत नोंदणीकृत झालेल्या अनुसूचित जातीच्या एक लाख 29 हजार 511 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे 172 कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत महाडीबीडी प्रणालीवर वितरित करण्यात येणार आहेत.

एकूण चार लाख 60 हजार 760 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख 51 हजार 263 अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले असून, दोन लाख 71 हजार 38 विद्यार्थ्यांची 378 कोटींची देयके महाडीबीटी पोर्टलवर जनरेट करण्यात आली आहेत. त्यातील एक लाख 41 हजार 527 विद्यार्थ्यांचे शिक्षणशुल्क, परीक्षाशुल्क व इतर शुल्काची 171 कोटींची रक्कम व निर्वाहभत्त्याचे 35 कोटी, अशी एकूण 206 कोटींची रक्कम ई-वॉलेटवर वितरित करण्यात आली आहे.

- Advertisement -

आधार लिंक नाही झाले किंवा कोड चुकीचा टाकला तर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतो. तसेच प्रत्यक्ष निधीचे वितरण ‘पीएफएमस’ या केंद्राच्या यंत्रणेतून होते. त्याची दैनंदिन विद्यार्थी संख्या कमी आहे.

त्यामुळे शिष्यवृत्तीचे पैसे वर्ग करण्यास विलंब होत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शिष्यवृत्तीचे पैसे विलंबाने येतात म्हणून विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करू नका, अशा सूचना शाळा व्यवस्थापनांना देण्यात येतील, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या