पेठमधील नववधू वरांचा अनोखा पायंडा; पन्नास वऱ्हाडीना रोपांचे वाटप
स्थानिक बातम्या

पेठमधील नववधू वरांचा अनोखा पायंडा; पन्नास वऱ्हाडीना रोपांचे वाटप

Gokul Pawar

वेळुंजे | वि.प्र : पेठ तालुक्यातील शेवखंडी येथे लॉकडाऊन मधील अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यातील उपस्थित पन्नास वऱ्हाडीना रोपे भेट देत अनोखा पायंडा पाडला आहे.

शेवखंडी या गावचा तरुण चित्रकार तसेच सोशल नेटवर्कींग फोरमचा सदस्य ज्ञानेश्वर गावित व हेमलता यांचा विवाह सोहळ्याची ही गोष्ट.

सध्या करोनामुळे लग्नाचा खर्च कमी करून लग्नात सामाजिक संदेश व उपक्रम राबवले पाहिजे अशी संकल्पना सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी मांडली होती. या संकल्पनेला प्रतिसाद देत येथील या नवंदांपत्याने विवाह पार पडल्यानंतर आठवण म्हणून घरासमोर एका वृक्षाचे रोपण केले. तर पन्नास वऱ्हाडीना रोपे भेट दिली. तर पन्नास रोपे ग्रामस्थांना वाटप करण्यात आली.

वर – वधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी यावेळी हभप सीताराम बाबा, मनोहर चौधरी, सोशल नेटवर्किंग फोरमचे समन्वयक संदीप बत्तासे, गोकूळ झिरवाळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ बत्तासे, देविदास कामडी, देवचंद महाले, अरुण सुबर, अनिल बोरसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com