शहरातील बिल्डर असोसिएशन कडून लाॅकडाऊनमध्ये २६ हजार गरजूंची क्षुधाशांती

शहरातील बिल्डर असोसिएशन कडून लाॅकडाऊनमध्ये २६ हजार गरजूंची क्षुधाशांती

नाशिक : शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे दायित्व म्हणून लाॅकडाऊनच्या काळातही तब्बल २६ हजार जेवनाचे डब्बे गरजूंना वाटप केले आहे.

लाॅकडाऊन संपेपर्यंत हे कार्य असेच सुरू राहिल, असा आशावाद बिल्डर्स असाेशिएशन आॅफ इंडिया, नाशिकचे खजिनदार अविनाश आव्हाड यांनी व्यक्त केला. कराेना व्हायरसचा शिरकाव टाळण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य, माेलमजूर व गरिबांना राेजच्या अन्नपाण्याची भ्रांत पडली आहे.

याचवेळी सामाजिक दायित्व म्हणूण अविनाश आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करून जे गरजू नागरिक आहे, त्यांच्या तयार जेवनाची व्यवस्था केली. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पाेलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महानगर पालिका अायुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली. या तिन्ही यंत्रणांच्या प्रमुखांनी आव्हाड व त्यांच्या टीमला पूर्णत: सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याकामी समन्वयक म्हणूण एका उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

त्यानुसार ज्या भागात खरचच गरजूंना अन्नाची आवश्यकता आहे, या भागांची माहिती संकलित करण्यात आली. तसेच जेथून अन्नाची मागणी आहे, तेथे पडताळणी करून अन्न पाेहचविणे सुरू करण्यात आले. लाॅकडाऊन जाहिर झाल्यापासून २६ हजार २५० डब्बे पाेहचविण्यात आले आहेत. हे काम अजूनही अविरत सुरू असून यात ४ पाेळ्या, पुलाव, साडेचारशे ग्रॅम भाजी, लाेणचे व चटणी दिली जाते. सध्या अनेक लाेकांनी या चळवळीत भाग घेतला आहे. कुणी खाद्यतेल, भाजीपाला व अन्य किराणा साहित्याचा पुरवठा करत आहे.

जशी मागणी तसा पुरवठा
आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडे शहरातील विविध भागातून ‘अन्न पाहिजे आहे‘, अशी मागणी हाेते. जशी मागणी हाेते, त्यानुसार त्यांचे स्वयंसेवक त्याभागात जाऊन पडताळणी करतात. त्यानुसार साेशल डिस्टन्सिंगचे पालन करून अन्न पुरविले जाते. या स्वयंसेवकांना एक लिटर सॅनेटायझर लिक्विड, टाेपी, मास्क व हँन्डग्लाेव्हज देखिल पुरविण्यात आले आहेत.

जिल्हा रूग्णालयाच्या स्टाफलाही जेवण

गरजूंना दिले जाणारे जेवन हे जिल्हा रूग्णालयाचे डाॅक्टर्स, नर्स व स्टाफलाही पुरविले जाते. येथे राेज ८० ते १०० डब्बे जेवन दिले जाते. हे जेवन बनविण्यासाठी तीन किचन उभारण्यात आले असून पहिला किचन आनंदवल्ली येथे आहे. तर दुसरा राजीव गांधी भवनजवळील माहेश्वरी विद्यार्थी भवन व तिसरा दिपालीनगर येथे उभारण्यात आला आहे.

आम्ही घरातच हे जेवन बनविताे. जे जेवन बाहेर पुरविले जाते, तेच आम्ही राेजच्या आहारात खाताे. तयार जेवण देणेच महत्त्वाचे आहे. जेथे किराणा, तेल, भाजीपाल्याची आवश्यकता आहे, तेथेही पुरविणे सुरू आहे. जिल्हा प्रशासन, मनपा व पाेलीस प्रशासन जेथे सुचविते तेथे अन्न पुरविले जाते. आर्ट आॅफ लिव्हिंगचे आम्ही सहकारी मिळून हे काम करताेय. -अविनाश आव्हाड, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com