‘परिवार मित्र’च्या माध्यमातून एक लाखावर लोकांना विनामूल्य होमिओपॅथी औषधांचे वाटप

‘परिवार मित्र’च्या माध्यमातून एक लाखावर लोकांना विनामूल्य होमिओपॅथी औषधांचे वाटप

नाशिक : करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. अशा काळात होमिओपॅथी औषधे कोव्हिड १९ च्या रुग्णांवर गुणकारी ठरत आहे असे आढळून आले आहे, असे तज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रात कोव्हिडचे संकट गडद होत चालले असतांना नाशिकच्या मॅकवेल इंडस्ट्री लिमिटेडचे संचालक संजय शहा यांनी समाजात होमिओपॅथी औषधांचे वाटप विनामूल्य करायचे ठरवले. याकाळात नाशिकचे होमिओपॅथी डॉक्टर अनुप गवांदे हे आपल्या परीने होमिओपॅथी औषधांचे विनामूल्य वाटप करत होते. यांची भेट घेऊन आपल्या उपक्रमाबद्दल संजय शहा यांनी माहिती दिली. डॉ. संजय गवांदे यांनी तात्काळ संमती दर्शवली. या नंतर खऱ्या कामाला सुरुवात झाली. डॉ. हर्षदा तलेगावकर यांची भेट घेवून चर्चा केली.

या कामी मोठ्या प्रमाणात होमिओपॅथी औषधाची गरज होती. डॉक्टर हर्षदा तळेगावकर, डॉक्टर अनुप गवांदे व संजय शहा यांनी स्वयंम औषध निर्मिती करण्याचे ठरवले. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे ठरवले. तशी यंत्रणा नाशिक रोड येथील मोटवानी रोड, आनंद नगर येथील संजय शहा यांनी आपली इमारत औषध निर्मिती साठी दिली व त्याठिकाणी प्रकल्प निर्मिती सुरू करण्यात आली. औषध निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यास दिनांक ३ मे पासून सुरवात करण्यात आली

आता पर्यंत १ लाख दहा हजार कुटुंबा पर्यंत औषधे पोहचविण्यात आली. याचा फायदा ५ लाख व्यक्तींना झाला आहे. यामध्ये सफाई कर्मचारी, घंटा गाडी कर्मचारी, रेल्वे पोलीस, आशाताई कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मागणी वरून नाशिक शहर पोलिसांना, डी. आय. सी., नाशिक मध्यवर्ती कारागृहा, पुणे येथील कातकरी समाज, महाराष्ट्र राज्य महावितरण त्याच प्रमाणे नाशिक ग्रामीण मधील सिन्नर तालुका, नाशिक तालुका, दिंडोरी तालुक्यातील काही भागात मुंबई, ठाणे, दहिसर, वलसाड या भागात मोफत औषधाचे वितरण करण्यात आले.

परिवार मित्र मंडळ नाशिक रोड या संस्थेने या कार्यात जोडले असून दररोज १० हजार कुटुंबियांना पुरवले जाईल इतके उत्पादन केले जात आहे. या संस्थेचे पदाधिकारी योगेश थत्ते, भास्करराव चितळे, मृत्युंजय कापसे, केशव सूर्यवंशी, विजय ताळेगावकर, मंगेश कुलकर्णी, विलास कुलकर्णी हे कार्यरत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com