जिल्ह्यात आजपर्यंत ६०१ करोना रुग्णांना डिस्चार्ज ; सद्यस्थितीत १८७  रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत ६०१ करोना रुग्णांना डिस्चार्ज ; सद्यस्थितीत १८७  रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६०१  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  त्यात ग्रामीण भागातील ६७, नाशिक मनपा क्षेत्रातील ३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातील ४६९  तर जिल्ह्याबाहेरील २८  रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

विभागनिहाय स्थिती

पॉझिटिव्ह रुग्ण :
नाशिक ग्रामीण मध्ये १११, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४९ तर जिल्ह्याबाहेरील ३०  असे एकूण ८३८ रुग्ण प्राप्त आजतागायत कोरोना बाधित आढळून आले आहेत.

पूर्णपणे बरे झालेले रुग्ण :
एकूण बाधित रूग्णांपैकी नाशिक ग्रामीण मधुन ६७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ४६९ तर जिल्ह्याबाहेरील २८ असे एकूण ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक जिल्हा रूग्णालय २५, नाशिक महानगरपालिका ९, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ५२,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ५६, नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी. ३३, गृह विलगीकरण १२  असे एकूण १८७ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दाखल रुग्ण :
आज जिल्ह्यात नव्याने नाशिक जिल्हा रूग्णालय ०५, नाशिक महानगरपालिका १२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र ४४, तर नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी. २० असे एकूण ८१  संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

मृत्यु :
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ४० अशा एकूण ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज कुठेही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची नोंद नाही

प्रलंबित अहवाल :
नाशिक ग्रामीण भागातून ४३, नाशिक महानगरपालिका क्षेत्र १६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र १५५ असे एकूण ३६४ रुग्णांचे अहवाल आजअखेर प्रलंबित आहेत. यात आज नव्याने घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांचाही समावेश आहे.

लक्षणीय :
८३८ करोनाबाधित रुग्णांपैकी ६०१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

मालेगांव महानगरपालिका क्षेत्रामधून सर्वाधिक ४६९ रुग्णांना पुर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८७ पॉझिटिव्ह रुग्ण

आजपर्यंत निगेटीव्ह अहवालांची संख्या ६ हजार ६२६

आज नव्याने आढळून आले ३८ करोनाबाधित रुग्ण

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com