पारावरच्या गप्पा : शेतकरी, पीकविमा अन अधिकारी
स्थानिक बातम्या

पारावरच्या गप्पा : शेतकरी, पीकविमा अन अधिकारी

Gokul Pawar

Gokul Pawar

(सकाळीच दाम्याच्या घरात खडखड चालू )
दाम्या : रखमे , म्या आज पुन्यांदा तालुक्याला जाऊन येतु
रखमे : व्हय व्हय, जाऊन या , पर आज काम करूनच या बरं, काल बी हात हालवतच आलाईसा
दाम्या : वाईस भाड्यापुरतं पैस हायीत का तुझ्याकडं?
रखमे : देते थांबा, येताना थोडं भाजीलाबी घेऊन या ..
दाम्या : व्हय, आता जातु म्या, न्हायतर सातची बस ढळायची..
(तहसील कार्यालयात )

तलाठी तात्या (फोनवर ) : हा साहेब करतो पार्सल भेटलं तुमचं, तुमचंच काम चालूय. .. चला ठेवतो..
कर्मचारी : साहेब, तो पत्र्याचा पाड्याचा दाम्या आज पुन्हा आलाय ? काय सांगू त्याला
तलाठी : सांग साहेब जेवत्यात म्हणून ..
कमर्चारी बाहेर येऊन दाम्याला : साहेब जेवायला बसलेत, थोडं थांबा, न्हायतर तुमची इतर काम करून या..
दाम्या : न्हाय ..इथंच बसतो.. (थोडयावेळाने साहेब जेवण करून बाहेर पडतात .)
दाम्या : साहेब, माझं काम कधी व्हणार, माझ्याबी शेताच नुकसान झालंय, माझ्या पिकविम्याचं काय?
तलाठी : हे बघ दामू, तुझी फाईल पडून हाय.. तेवढं फॉर्मचा पैसे भरा म व्हईल तुझं बी काम… चल ये उद्या आता..
(असं म्हणत तलाठी कार्यालयाबाहेर जातो. दाम्या पुन्हा हात हलवत घराकडे निघतो.)

रंग्या : लेका संत्या, त्या पिकविमाची काय भानगड हाय.. दाम्या काका दोन दिस झालंय, सारखा तलाठ्याची पायरी चढ़तोया…
संत्या : आज बी गेलाय ( तेवढ्यात समोरून दामू जातांना दिसतो) अय दामूकाका आर झालं का पिकविम्याचं काम?
दाम्या : न्हाय गड्या ओ, उद्या परत बोलावलंय…
संत्या : व्हय पर तुमचं कागदपत्र बी क्लिअर हायेत, शेतीच नुकसान बी झालंय , मग अडचण काय हाय..
दाम्या : मला तर काय बी कळंना झालंय…
रंग्या : थांबा आपण उद्या सरपंचाला घेऊन जाऊया, बघतो कास काम व्हतं नाय ते?
(सकाळी सरपंचाबरोबर दाम्या तलाठी कार्यालय गाठतो)

दाम्या : साहेब, येऊ का? आज व्हईल का?
तलाठी : हे बघ दाम्या ,आज काही नेट चालना झालंय, उद्या तुझं काम होऊन जाईल, (तेवढ्यात सरपंच येत्यात)
सरपंच : चालू तर दिसतंय, यांच्याच कामाला नेट जातंय व्हय, अन कसले पैसे मागतात ओ..
तलाठी : पिकविम्याचा फॉर्म भरण्यासाठी पैसे लागतात.. आम्ही ते सर्वाकडून घेतलेत..
सरपंच : बरं, चला पैसे हि भरतो, तास आम्हाला लिहून द्या..

तलाठी : असं कस, यांचं तेवढं नुकसान झालं नाही, तरीपण मदत देतोयना ..
सरपंच : अव पोटच्या पोराला इतका जीव लावला न्हाय तितका आम्ही पिकाला लावतो अन तुम्ही … औंदा पावसाने नुकसान केलंया, ते बी तुम्हाला दिसणा व्हय.. एक काम करा तुम्ही पैसे घेतल्याची लेखी द्या, आम्ही बघतो पुढचं ?
तलाठी : हे बघा करतो तुमचं काम मी, काही पैसे देऊ नका.. पण आरडाओरड करू नका …

सरपंच : हे बघा साहेब अशी गरिबांची तोंड दाबून संसार होत नसतो, कष्ट करायची हिम्मत ठेवा, चल दामू ..
दाम्या : साहेब, कवा येऊ आता..
तलाठी : दामू, आता ऑफिसात यायची गरज नाही, बँकेत तुझे पैसे जमा होतील, ये तू …
दाम्या : धन्यवाद साहेब, येतो म्या….

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com