स्थानिक बातम्या

संत निवृत्तीनाथ पादुका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : टाळ मृदुंगाच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखीचे शनिवारी (दि.०६) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.

दरम्यान यंदाची पंढरपूर वारी रद्द झाली असली तरीही काही निवडक वारकऱ्यांच्या सोबतीने पादुका घेऊन त्र्यंबकेश्वर येथुन प्रस्थान केले आहे. यावेळी संत निवृत्तीनाथ मंदिरास प्रदक्षिणा घालत पालखी सभा मंडपात ठेवण्यात आली. वारकऱ्यांनी टाळ मृदुंगचा गजर करीत अभंग म्हणत पालखीचे प्रस्थान झाले. साधारण ३० जूनपर्यंत पंढरपूरला शिवशाही बसने मार्गस्थ होणार आहे.

यंदा करोनाच्या संकटामुळे पायी वारी रद्द होऊन पादुकाच पंढरपूर कडे रवाना झाल्या आहेत. यासोबत
वारीचे मानकरी सुरेश गोसावी, पंढरपूरचे मोहन महाराज बेलापूरकर, सिन्नर तालुक्याचे बालकृष्ण डावरे महाराज तसेच वारकरी व फरशिवाले महाराज, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पवन भुतडा, विश्वस्त योगेश गोसावी, संजय धोंगडे, पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, रामभाऊ मुळाने सौ ललिता शिंदे, जिजाबाई लांडे तसेच संत निवृत्तीनाथ भजन मंडळ वारकरी इ सामील झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com