त्र्यंबकेश्वर : आंबोली धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; एकाला वाचविण्यात यश
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : आंबोली धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; एकाला वाचविण्यात यश

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक  : येथील आंबोली धरणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोशन लाखन असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचबरोबर असणाऱ्या उत्तम धोंगडे या विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले आहे

दरम्यान अधिक माहिती अशी कि, आंबोली येथील आश्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वनभोजनासाठी आंबोली धरणावर आले होते. यावेळी रोशन आणि उत्तम हे दोघे पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही धरणांत बुडाले. आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले. यामध्ये रोशन याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले , तर दुसरा उशिरा सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचा मृत्यू देह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना वनभोजनासाठी नेल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची काळजी घेणे आवश्यक असतांना शिक्षकवर्गाचा निष्काळजीपणा याठिकाणी दिसून आला. यामुळे रोशनच्या नातेवाईक संतप्त सवाल करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com