नांदगाव : सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचे आकस्मिक निधन
स्थानिक बातम्या

नांदगाव : सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचे आकस्मिक निधन

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव : येथील गुरुकृपा नगर मधील रहिवाशी तथा भारतीय लष्कराचे जवान मच्छिंद्र शांताराम बोगीर वय ३५ वर्षे यांचे पहाटे राहत्या घरी निधन झाले असून याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मच्छीन्द्र बोगीर हे भारतीय लष्करात सेवेत होते काही दिवसांपूर्वी वैद्यकीय रजा घेऊन सुट्टीवर आले होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ,बहिणी, पत्नी, आणि सात आणि तीन वर्षांच्या दोन मुली आहेत.
त्यांनी लष्करात पंधरा वर्षे सेवा बजावली आहेत. नुकतेच ते नांदगाव येथे राहण्यास आले होते. मोठे बंधू नंदू शांताराम बोगीर यांना त्यांच्या वहिनी यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास फोन करून मच्छीन्द्र यांची तब्येत सिरिअस असल्याचे कळविले, त्यांनी डॉक्टर चव्हाण यांना बोलावून मच्छीन्द्र यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.
मच्छीन्द्र बोगीर यांचे मुळंगाव हिसवळ असून त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नांदगाव पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहा.पो.नि.सुरवाडे, पो.उ.नि . दळवी आणि पोलीस कर्मचारी यांनी मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान याबाबत भाऊ नंदू बोगीर यांनी नांदगाव पोलिसात माहिती दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पो.उपनिरीक्षक दळवी, पो.ना.दिपक आव्हाड करीत आहे.
Deshdoot
www.deshdoot.com