देवळा : खामखेड्यात आढळला मृत बिबट्या
स्थानिक बातम्या

देवळा : खामखेड्यात आढळला मृत बिबट्या

Gokul Pawar

Gokul Pawar

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील काळखडी शिवारातील कळवणलगतच्या शेतात मूर्त बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या शिवारातील पार्वताबाई रामदास शेवाळे यांच्या मक्याच्या शेतात हा बिबट्या आढळून आला असून शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास लक्षात आल्याने हि घटना उघडकीस आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी खामखेडा गावाच्या कळवण रस्त्याला काळखडी शिवारातील विजपकेंद्राजवळ साधारणतः दोन वर्ष वयाचा बिबट्या मक्याच्या शेतात पडलेला दिसला. बिबट्या हालचाल करत नसल्यामुळे येथील शेतकरी निळकंठ पाटील यांनी गावातील ग्रामस्थांना कळवत वनविभागास कळवले .

वनविभागाच्या देवळा वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपरिमंडळ अधिकारी  डी.पी गवळी, वन कमिटीचे अध्यक्ष दीपक मोरे, वनरक्षक शांताराम आहेर आदींनी ग्रामस्थांनी समवेत घटनास्थळी भेट दिली. यानंतर पंचनामा करून मृत बिबट्याला देवळा वनविभाग कार्यालयात पाठवण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com