नव्या ९२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १६६६ वर

नव्या ९२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १६६६ वर

मुंबई : राज्यातील कोरोना बधितांचा आकडा वाढतच असून नव्याने ९२ रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर राज्यातील कोरोना बधितांचा आकडा १६६६ वर पोहोचला आहे.

दरम्यान देशात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र पुढेच आहे. दुर्दैवाने दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. नव्या आकडे वारी नुसार, महाराष्ट्रात आज कोरोनाच्या ९२ नवीन रुग्णांची झाली आहे. अशा प्रकारे एकूण रुग्ण संख्या १६६६ झाली आहे. तर कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

यामध्ये मुंबई ७२, औरंगाबाद ०२, मालेगाव ०५, पनवेल ०२, केडीएमसी ०१, ठाणे ०४, पालघर ०१, नाशिक ग्रामीण ०१, नाशिक शहर ०१, नगर ०१, पुणे ०१, वसई विरार ०१ असे एकूण ९२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रावरील हे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com