दिंडोरी शहरात बाजारपेठा बंद असतांनाही नागरिकांची गर्दी

दिंडोरी शहरात बाजारपेठा बंद असतांनाही नागरिकांची गर्दी

दिंडोरी : शहरात लॉकडाऊन असतानाही गर्दीचे प्रमाण वाढले असून नागरिक संभ्रमा अवस्थेत रस्त्यावर आले आहे. ३ मे रोजी लॉकडाऊन शिर्थील होणार असल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांना आनंद झाला होता. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर आले.

सकाळी व्यावसायिकांनीही बाजारात गर्दी केली होती. परंतु त्यांनी दुकाने उघडणे टाळले. वाईनशॉप कधी अधिकृत उघडतात याकडे अनेक मद्यप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. नाशिकला वाईनशॉप सुरु करण्यात येणार आहे. दिंडोरीला अधिकृत कधी वाईनशॉप चांलू होणार याकडे मद्यप्रेमीं लक्ष ठेऊन आहे.

शहरातील रणतळे येथे सकाळी २० ते २५ परप्रांतीय लोकांना अज्ञात वाहन चालकाने सोडून दिले. नंतर ते कुठे गेले याचा तपास लागला नाही. दुसरीकडे परप्रातीयांनी त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. परप्रांतीयांना व्यवस्थित माहिती मिळाली नाही.

शहरात करोनाचा रुग्ण असल्याची अफवा होती. परंतु त्यात कोणतेही तथ्य नव्हते. शहरातील खाजगी रुग्णालयात सहा ग्रामस्थांना क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांंचा निकाल येणे अजून बाकी आहे. सामान्य ग्रामस्थ रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. कोणतेही दुकाने उघडले नसले तरी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु असल्याचे आढळून आले.

शहरात सिमेंटचे दर वाढले असून ४०० ते ४५० रुपये एका गोणीचे मोजण्यात आल्याची  चर्चा आहे. शेतीमालाचे भावही समतोल असून किराणा मालाचे दर अद्याप अनेक किराणा दुकानदारांनी लावले नसल्याने दिसून येते. सध्या करोनाचे रुग्ण देशात वाढत चालले असताना दिंडोरी शहरात सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो.

शिवाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात करोनाचा रुग्ण आढळल्यास त्याला ठेऊ नये, कारण हे खाजगी रुग्णालय नागरीवस्तीच्या  मध्यभागी असल्याने नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे निणर्र्य घ्यावा अशी मागणी दिंडोरी शहर विकास आघाडीचे रणजित देशमुख, महेश अंबाड, विनोद निकम, संजय चटोले, सचिन सुपे, दत्ता वाघ आदींनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com