नाशिकरोड : सोशल डिस्टन्सिंग राखत चिकन-मटण दुकानात गर्दी

नाशिकरोड : सोशल डिस्टन्सिंग राखत चिकन-मटण दुकानात गर्दी

नाशिकरोड । का.प्र. : चिकन, मटण विक्रीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्याने हळूहळू अशा दुकानात नागरिकांची गर्दी वाढत आहे. काल रविवार असल्याने परिसरातील बऱ्याच चिकन, मटणच्या दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतांना नागरिक दिसून आले.

पशु-पक्षी हे कोरोना विषाणूच्या वाहक असल्याच्या अफवा गेल्या महिन्यात पसरल्याने नागरिकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे पोल्ट्री उद्योग संकटात सापडला होता. या व्यवसायाला उर्जितावस्था देण्यासाठी अनेक तज्ज्ञाकडून जाहीरपणे समुपदेशन करण्यात आले.

लॉकडाऊन व त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेल्या नागरिकांनी कालच्या आहारात चिकन, मटणचा समावेश केल्याचे अशा दुकानासमोरील गर्दीमुळे दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com