दिंडोरीत तीन दुकांनदारांविरुद्ध गुन्हा दाखल

दिंडोरीत तीन दुकांनदारांविरुद्ध गुन्हा दाखल

दिंडोरी : संचार बंद असतांनाही दुकाने सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानदार विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान देशभर लॉक डाऊन असतांना दिंडोरी शहरात संचार बंदी आहे. संचार बंदी मध्ये सर्व दुकांनाना बंद ठेवण्याचे आदेश आले आहे. तथापि शहरातील दुकाने, बाजार सुरू ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने वारंवार सर्वच दुकानदारांना सूचना केल्या होत्या तरीही नियमांचे उल्लंघन केले जात होते.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने कडक मोहीम राबविली. त्यात नियमांचे उल्लंघन करून ३ दुकानदारांविरुद्ध दुकान कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात मिलिंद हार्डवेअर, रामप्रभु क्लॉथ सेंटर व रामेवश्वर ट्रेडर्स या तीन दुकांनाविरुद्ध कलम १८८ अन्नवय गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे दिंडोरी शहरात खळबळ उडाली असून इतर दुकांदारांचेही धाबे दणाणले आहे.

यापुढील काळातही लॉकडाउन चे उल्लंघन करणाऱ्या दुकांनदारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com