सटाणा : पठावे-सावरपाडा येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्या
स्थानिक बातम्या

सटाणा : पठावे-सावरपाडा येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्‍चिम आदिवासी भागातील पठावे- सावरपाडा येथील प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पठावे ग्रामपंचायत हद्दीतील सावरपाडा येथील पुजा बंडू गांगुर्डे (१८) तर पठावे येथील रवींद्र पोपट पवार (२२) या प्रेमीयुगुलाने सावरपाडा शिवारातील गट नंबर १०२ मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सदर प्रकार लक्षात आल्यानंतर पठावेचे पोलीस पाटील दयाराम पवार यांनी सटाणा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सटाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदरचे मृतदेह ताब्यात घेत सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

याबाबत सटाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास सटाणा पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई पोलीस हवा. प्रकाश जाधव पोलीस हवा.सोळंके, राहुल शिरसाठ, भोये तपास करीत आहेत

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com