पंचवटी : नगरसेविका शांता हिरे यांची विष प्राशन करून आत्महत्या
स्थानिक बातम्या

पंचवटी : नगरसेविका शांता हिरे यांची विष प्राशन करून आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचवटी : नगरसेविका शांता हिरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान पंचवटीत राहणाऱ्या शांता बाळू हिरे (वय ५८) प्रभाग क्र.४ च्या भाजप नगरसेविका होत्या. आज दुपारी ३. ३० च्या सुमारास घरी विषारी औषध सेवन केले. यावेळी त्यांच्या मुलाने उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलेल्या त्या होत्या.

Deshdoot
www.deshdoot.com