उद्यापासून जिल्ह्यातील मंगल कार्यालये बंद; मातोरीत हळदीच्या दिवशीच लग्न
स्थानिक बातम्या

उद्यापासून जिल्ह्यातील मंगल कार्यालये बंद; मातोरीत हळदीच्या दिवशीच लग्न

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून शहरातील मंगल कार्यालय, लॉन्स मॅरेज, हॉल तसेच इतर विवाह स्थळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यामध्ये सर्व यात्रा व गर्दीचे उत्सव रद्द करण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर उपायोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच दि.१९ पासून ते ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरात राज्यातील इतर भागातून अनेक नागरिक प्रवास करून येत आहेत.

यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषता लग्न समारंभ अथवा तत्सम स्वरूपाच्या समारंभासाठी अनेक नागरिक उपस्थित राहत असतात. त्या सर्वांची पूर्व तपासणी करणे अशक्य असल्याने मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

सध्या देशात, राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता महापालिका आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. आयुक्त, महापौर व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स, मोठे हॉल, सभागृहे अशा ठिकाणी सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे, वाढदिवस आदी कार्यक्रम ३१ मार्च २०२० पर्यंत आयोजित करू नयेत. त्यापुढे परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत हे कार्यक्रम स्थगित ठेवावेत.

Deshdoot
www.deshdoot.com