Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलिस दलातील २०२८ पोलिसांना करोना व्हायरसची लागण

मुंबई पोलिस दलातील २०२८ पोलिसांना करोना व्हायरसची लागण

मुंबई : मुंबई शहरात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे मुंबई पोलिसांवरील ताण साहजिकच जास्त आहे. मुंबई पोलिस दलातील तब्बल २०२८ पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर SRPF च्या ८२ जणांना कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे.

महाराष्ट्र राज्याभोवती असलेला कोविड-१९ चा वेढा दिवसागणिक अधिक मजबूत होत आहे. करोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आहे. यात नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलिस कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडलेले आहेत.

- Advertisement -

करोना व्हायरसच्या संकट काळात पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर यांसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यापैकी मुंबईत तैनात करण्यात आलेल्या ८२ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

दरम्यान करोना व्हायरस बाधित पोलिस आणि एसआरपीएफ च्या जवानांवर योग्य उपचार आणि उत्तम सुविधा मिळतील असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या