स्थलांतरित मजुरांची गावी जाण्यासाठी पायपीट; अनेक संस्थांची मदत

स्थलांतरित मजुरांची गावी जाण्यासाठी पायपीट; अनेक संस्थांची मदत

सातपूर : देशभरात करण्याच्या संकटात सापडलेल्या अनेक कामगारांनी आपल्या उपजीविकेसाठी शेकडो मैल पायपीट करत घर गाठत असल्याचे चित्र असतानाच नाशिकमधील काही बांधकाम व्यावसायिकांनी मात्र आपल्या कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी विश्वास निर्माण करत आपले सामाजिक भान जपले आहे.

संपूर्ण भारत ठप्प झाल्यानंतर नाशकातही कामगारांनी आपली उपासमार होऊ नये म्हणून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला जाण्यासाठी कोणतीच वाहन व्यवस्था नसल्याने अनेकजण पायीच मार्गक्रमण करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा वातावरणात नाशिक येथील अनेक सेवाभावी संस्था पुढे येत या मजुरासाठी जाण्याचे साधन उपलब्ध करून देत आहेत. तर अनेकजण यांच्या राहण्याची तसेक्क्ष्ह जेवणाची सोय करताना दिसत आहेत.

तर शहरातील बांधकाम व्यवसायिक ललित रुंग्ठा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विश्वास देणारे पाऊल उचलले कर्मचाऱ्यांना अपील करताना कोणीही घाबरून न जाता स्थिर आपल्या घरात थांबावे रुंग्ठा ग्रुप ची सलग्न असलेल्या प्रत्येकाला त्याचा पगार ऍडव्हान्स मध्ये खात्यात टाकला जाईल कोणालाही काही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले अडचणीच्या काळात स्वस्त व सुरक्षित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा येथील अनेक मजूर नाशिक तसेच जिल्ह्यातील अनेक भागात कामानिमित्त गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनेक मजुरांना तय्न्च्या गावी देखील पाठवण्यात आले आहेत. तर नाशकातील अनेक ठिकाणी बांधकाम मजूर साईट वरच मुक्कामाला दिसून येत आहेत. या कामगारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू नये यासाठी बांधकाम व्यवसायिक अन्नधान्य पुरवत असल्याचे क्रेडाईचे पदाधिकारी क्रुणाल पाटील यानी सांगितले.

कोरोनाच्या संकटाने बांधकाम व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम टप्पा होते नुकतेच कुठे बांधकाम व्यवसायाने गती पकडली असताना कोरोना संकटाने पुन्हा एकदा व्यवसाय अडचणीत सापडला आहे हे संकट टळले यानंतरही व्यवसायाच्या उभारणीला मोठा कालावधी लागणार आहे. प्रत्यक्षात आगामी चार ते सहा महिने व्यवसाय उभारणे कशी होणार आहे त्यामुळे आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना सांभाळण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

नाका कामगार गावाकडे रवाना
शहरातील परिस्थिती गंभीर होऊ पाहत असताना नाका कामगारांनी मात्र तातडीने आपले गाव गाठले आहे शहरी वसाहतींमध्ये भेडसावणार्‍या अडचणी गावात कमी होत असत त्यामुळे या कामगारांनी गावाकडेच प्रस्थान करणे पसंत केले आहे यात बहुत आयुष्य त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा हर्सूल या पट्ट्यातून कामगार येत असतात त्यांनी तातडीने घर गाठणे पसंत केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com