महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, राज्यात रुग्णसंख्या ७४ वर
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, राज्यात रुग्णसंख्या ७४ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला. आता देशात एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असल्याचे चित्र असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आजच्या नव्या अपडेट्सनुसार राज्यात रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या आकडेवारीनुसार यात जवळपास दहा रुग्णांची भर पडली आहे. वरील दहा रुग्णांमध्ये ६ मुंबईचे आणि ४ पुण्याचे रुग्ण आहेत. आज कोरोना बाधीतांमधील एका रुग्णाचा मृत्यू एचएन रिलायन्स रुग्णालय मुंबईमध्ये झाल्याचे समजते.

मृत रुग्ण हा ५६ वर्षांचा होता. ही व्यक्ती २१ मार्चला रुग्णालयात दाखल झाली होती. आता महाराष्ट्रात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात ५ जणांचे बळी गेले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com