जिल्ह्यात कोरोना पीपी किट्सचा तुटवडा; उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु

जिल्ह्यात कोरोना पीपी किट्सचा तुटवडा; उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु

नाशिक : कोरोना विषाणूपासून बचावासाठी डाँक्टरांना अत्यावश्यक असलेले पर्सनल प्रोटक्शन (पी.पी.) किट्सचा जिल्हा तसेच राज्यभरात मोठा तुटवडा निर्मान झाला आहे. यामुळे सध्या मोठा धोका पत्करुन डाँक्टर काम करत आहेत.

देशभरात करण्यात आलेल्या लाँकडाऊनच्या परिणामी अनेक वैद्यकिय साधने बनविणार्‍या कंपन्या बंद आहेत. यात डाँक्टरांना कोणत्याही विषाणुचा शरिराशी सबंध येऊ नये यासाठी पर्सनल प्रोटक्शन (पी.पी.) किट्स महत्वाचे असुन याचे उत्पादनही बंद झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पीपी किट्सचा तुटवडा डाँक्टर तसेच सर्व वैद्यकिय क्षेत्राची काळजी वाढवणारा आहे.

जिल्ह्यात एकून ४ हजार डाँक्टर आहेत. पैकी ६० टक्के डाँक्टरांचा दररोज सर्वसामान्य तसाच श्वसनाशी निगडीत आजाराच्या रग्णाशी येतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सर्व डाँक्टरांना त्यांचे रग्णालये सुरू ठेवण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे डाँक्टरांना स्वतचे संरक्षण तुटपुंजा साधनांनी करावे लागत आहे.

जिल्हा शासकिय रुग्णालयातही याचा परिणाम होत असून कोरोना कक्षात कार्यरत वैदकिय अधिकारी वगळता इतर ओपीडी, तात्काळ उपचार कक्ष, तेथील कर्मचारी यांना एचआयव्ही पीपी किट्स दिले जात आहेत. इतर परिचारीका व सर्व कर्मचार्‍यांना कोरोना पीपी किट्सची गरज आहे.

वापर काही तास
कोरोना पीपी किट्सचा वापर एक डाँक्टर अथवा कर्मचारी एकदाच करू शकतात. याचा पुर्वापर होत नाही. ते तात्काळ नष्ट करावे लागतात. या एका किटची किंमत दिड हजार रुपयांपासून पुढे आहे.

सध्या संपुर्ण राज्यातच पीपी किट्सचा तुटवडा आहे. आमचे डाँक्टर स्वताचा तसेच कुटुंबाचा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. सर्वांनाच पीपी किट्स उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासन वा आयएमए प्रयत्न करत आहे.
– डाँ. देवरे, अध्यक्ष आयएमए

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com