दिंडोरी तालुक्यात पुन्हा करोनाचा शिरकाव; जानोरीचा शेतकरी करोनाग्रस्त
स्थानिक बातम्या

दिंडोरी तालुक्यात पुन्हा करोनाचा शिरकाव; जानोरीचा शेतकरी करोनाग्रस्त

Gokul Pawar

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथे करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून नाशिक बाजार समितीच्या निमित्ताने दिंडोरी तालुक्यात पुन्हा करोनाचे पुनरागमन झाले आहे. यामुळे जानोरी- आंबेदिंडोरी रस्त्यावरील रुग्णाचे क्षेत्र प्रतिबंधित  करण्यात आले आहे.

जानोरी गावातील जानोरी-आंबेदिंडोरी रस्त्यावरील एका ५३ वर्षीय रुग्णाला करोनाची लागन झाली आहे. या रुग्णाला मुत्राशयाविषयी  त्रासामुळे नाशिक येथील अशोका हॉस्पिटल येथे  दाखल करण्यात आले होते.  या रुग्णाची तपासणी केली असता त्याचा अहवाल सकारात्मक झाला आहे. हा रुग्ण शेतकरी असून त्यांचे नाशिक बाजार समितीमध्ये जाणे-येणे होते. या रुग्णाच्या संपर्कातील संशयितांना होमक्‍वारंटाईन करण्याचे प्रक्रिया सुरु असून त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

या रुग्णाच्या गावातील घरापासून १ कि.मी.चा परिसर कँन्टेनमेट झोन आणि दोन कि.मी.चा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा परिसर व गाव पुढील १४ दिवस पुर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी अत्याश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, सुरक्षित अंतराचे पालन करावे, तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनी केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी नाशिक बाजार समिती येथे भाजीपाला घेऊन गेलेले होते. अनेक वाहनचालकांचा यापुर्वी नाशिक बाजार समितीशी संपर्क आला आहे. सर्व ग्रामस्थांनी करोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी खरेदी-विक्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे दिंडोरी शहरातही जनतेने सामाजिक अंतराचे पालन करावे, जेणेकरुन दिंडोरी तालुक्यात करोनाची साखळी खंडीत करता येईल व शासकीय नियमाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन  अ‍ॅड.प्रदिप घोरपडे, रणजित देशमुख, गुलाबराव गांगोडे, अ‍ॅड.शैलेश चव्हाण, अ‍ॅड.अरुण ठेपणे, दौलतराव अरगडे, सुजित मुरकूटे, आदींनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com