शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद’; पोलिसांचा चोख बंदोबस्त
स्थानिक बातम्या

शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद’; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दुकाने, शाळा, वाहतूक चालू असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत असून काही भागात बंद पाळला जात आहेत काही भागात बंद जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र बंद हा नागरिकत्व सुधारणा कायदा , राष्ट्रीय नागरिक नोंदणी या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीनं पुकारला आहे. त्यादृष्टीने शहरात ठीकठिकाणी पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त आहे.

तसेच राज्यात मुंबई, लातूर आदी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com