नाशकात थंडीचा कहर कायम; पारा ७.८ वर
स्थानिक बातम्या

नाशकात थंडीचा कहर कायम; पारा ७.८ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा मुक्काम कायम असून आजही सकाळपासून थंडीचा जोर आहे. शुक्रवारी ६ वर घसरलेला पारा आज सकाळी ७. ८ अंशापर्यंत वधारला असला तरी थंडीचा कहर कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दिवसभर गारठा जाणवत आहे. शुक्रवारी सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक तर निफाड येथे करण्यात आली आहे. त्यानंतर आज थंडीचा पारा १ अंश सेल्सियसने घरसला आहे.

जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरत असून, शुक्रवारी किमान ६ अंश सेल्सियस इतके होते. हे तापमान शनिवारी अंशाने वधारले. त्यामुळे दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खालवल्याने शहर अन् जिल्ह्यातील जनजीवनावर कमालीचा विपरीत परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा पारा आणखीन घसरणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com