एअर जेट प्रेशर मशीनने सराफ बाजार परिसरात नाल्यांची सफाई
स्थानिक बातम्या

एअर जेट प्रेशर मशीनने सराफ बाजार परिसरात नाल्यांची सफाई

Gokul Pawar

नाशिक : करोना संकटाशी दोन हात करत असताना महापालिकेने पावसाळी पूर्व नालेसफाईच्या कामांना देखील प्राधान्य दिले आहे. सराफा बाजारातील सरस्वती व इतर छोटया मोठया नाल्यांची एअर जेट प्रेशर मशीनच्या साह्याने साफसफाई करत स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे पावसाळयात पाणी तुंबून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका टळला आहे.

महानगरपालिका तर्फे अत्याधुनिक मशिनरीद्वारे मनपाच्या ५ ही विभागाच्या अधिकारी सह ५० कर्मचार्‍यांनी स्वछता मोहिम राबवली. एअर जेट प्रेशरच्या साह्याने सराफ बाजारातील व आसपासच्या परिसरातील नाले, परिसर स्वछ करण्यात आला.

अशाप्रकारे अत्याधुनिक मशिनरीच्या सहाह्याने स्वच्छता मोहीम पहिल्यांदाच याभागात राबवली गेली. यामुळे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे स्थानिक व्यापारी व स्थानिक रहिवाश्यांचे दरवर्षी नुकसान खूप नुकसान होते. गतवर्षी पावसाळयात दोनदा सराफा बाजारात पाणी शिरले होते. त्यामुळे साधारणत : कोट्यवधीचे नूकसान सराफा व्यावसायिकांना झाले होते. ते बघता ही परिस्थिती पुन्हा उद् भवणार नाही याची दक्षता महापालिकेने घेतली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले, नासिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, मेहुल थोरात, शाम दुसाने, संजय सोनी, योगेश दंडगव्हाळ, तुषार चव्हाण व परिसरातील नागरिकही उपस्थित होते.

महापालिकेतर्फे अत्याधुनिक मशीनद्वारे नाल्यांची सफाई करण्यात आली. त्यामुळे पुराचा धोका कमी झाला आहे. सराफ असोसिएशन तर्फे महानगरपालिकाचे आधिकारी व स्वछता कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
चेतन राजापूरकर, अध्यक्ष
सराफा बाजार , नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com