लॉकडाऊनमुळे शहर बससेवेचा मुहूर्त लांबणीवरच

लॉकडाऊनमुळे शहर बससेवेचा मुहूर्त लांबणीवरच

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणुन पुर्णत्वास येत असलेल्या शहर बससेवाचा १ एप्रिलचा मुहूर्त हुकल्यानंतर दुसरा १ मे २०२० चा मुहूर्त देखील हुकला आहे. या प्रकल्पांच्या काही परवानग्या लॉकडाऊनमुळे रखडल्याने शहर बससेवेचा शुभारंभ पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सक्षम व शाश्वत शहर बससेवा करण्याचा निर्णय महासभेने १९ सप्टेंबर २०१९ रोजी घेतला आहे. हा शहर बससेवा प्रकल्प ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट (जीसीसी) तत्वावर राबविण्यात येणार असुन यासाठी ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहे.

याकरिता लागणारे नवीन डेपो, टर्मिनल, बस थांबे व इतर पायाभूत सुविधा उभारण्याची कामे विविध पातळीवर सुरू आहे. शहर बससेवेचा दरवर्षाचा तोटा लक्षात तो कमी करण्यासाठी ४०० ऐवजी ३०० बसेस चालविण्याचा निर्णय सत्ताधार्‍यांनी घेतला आहे.

पर्यावरण राखण्यासाठी प्रदुषणमुक्त अशा सीएनजी व इलेक्ट्रीक बसेस जास्त प्रमाणात चालविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनपुर्वी शहरात ऑपरेटकडुन सुमारे २५० बसेस आणण्यात आल्या असुन त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्या विविध भागात ठेवण्यात आल्या आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २३ पासुन लागु झालेला लॉकडाऊन आता तो तिसर्‍या टप्प्यात १७ मे पर्यत लागु राहणार आहे. या लॉकडाऊनमुळे शहर बससेवेच्या अनेक कामांना ब्रेक लागला असुन यासाठी लागणार्‍या शासनाच्या लेखी परवानगी अडकल्या आहे. तसेच सीएनजी संदर्भातील कामे देखील थांबली आहे.

अशाप्रकारे पायाभूत कामे, पवानग्या अडकल्याने आता शहर बससेवेला मुहूर्त पावसाळयात जाणार असल्याची सुत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com