Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याउपनगर :  मार्च-एप्रिल महिन्यात नागरिकांना सरासरी बिल मिळणार; सरासरी बिल म्हणजे काय?

उपनगर :  मार्च-एप्रिल महिन्यात नागरिकांना सरासरी बिल मिळणार; सरासरी बिल म्हणजे काय?

उपनगर : महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वीज महामंडळाचे कंत्राटी सेवक मीटर रिडींग साठी घरोघरी येतात. पण मार्चमध्ये तारीख उलटूनही ते आले नसल्याने यंदा सर्व ग्राहकांच्या हाती सरासरी बिल पडणार, यामुळे विज ग्राहकां मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनता मेटाकुटीला आली आहे. जनता कर्फ्यु आणि संचारबंदी मुळे सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यालय देखील बंद आहेत. या भयंकर परिस्थितीत नागरिकांना थोडी सूट मिळावी यासाठी विज महावितरण कंपनीने सर्व ग्राहकांसाठी सरासरी विज बील देण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने विज कंपनीचे कंत्राटी सेवक यांना तसे आदेश पारीत करण्यात आले. त्यामुळे मीटरचे रिडींग घेण्यासाठी सेवक आलेच नाहीत.

- Advertisement -

नागरिकांना या महिन्यात सरासरी बिल देणार हे कंपनीने जाहीर करून देखील त्यांना अजिबात शाश्वती वाटत नव्हती. कारण कंपनीच्या पूर्वानुभव नुसार एक महिना बिल भरण्यासाठी उशीर झाला तरी सेवक नागरिकांच्या दारा समोर ठाण मांडायचे. किंवा कोणाचे काहीच न ऐकता सर्व घरातील विज खंडित करून मोकळे व्हायचे. यंदा २३ तारीख उलटली, तरी मीटर रिडींग घेण्यासाठी कंत्राटी सेवक आले नसल्याने अनेक विज ग्राहकांनी दूरध्वनी वरून उपनगर विज कार्यालयाशी संपर्क साधून याची निश्चित खात्री करून घेतली. एप्रिल महिन्यात सरासरी बिल येणार असल्याचे पलीकडून सांगण्यात येत असल्याने विज ग्राहकांनी सुटकेचा निः स्वास सोडला.

सरासरी बिल हे कसे आणि कुठल्या स्वरूपाचे असणार असा प्रतिप्रश्न केल्यानंतर कार्यालयात प्रत्येक घरगुती विज ग्राहकाची १२ महिन्यांच्या यादी नुसार एका महिन्यात संबंधित ग्राहकाकडून किती युनिट वापरले जातात हे अपडेटेड सिस्टीम मुळे कळत असल्याने विज बिल देण्यास सोपे जाईल, ग्राहकांनी काळजी करू नये, असे उपनगर विज कार्यालयातर्फे सांगण्यात आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. चैत्र महिन्यास सुरुवात झाल्याने वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. त्यात विज कंपनीने सरासरी बिलं देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने या भयंकर परिस्थितीत विज ग्राहकांना थोडाफार थंडावा मिळत असल्याचे दिसून येत आहे. १ ते १०० युनिट पर्यंत विज दर माफ करून जनतेला याकाळात दिलासा द्यावा आणि ईतर छुपे कर यामधून सुटका करावी अशी मागणी उपनगर विज ग्राहकांनी केली आहे.

या महिन्यात सर्वच विज ग्राहकांना सरासरी बिलं देणार असल्याचे कंपनीने आधीच जाहीर केले. १२ महिन्यात आलेल्या सरासरी बिल नुसार एप्रिल महिन्यात बिले दिले जातील. सिस्टीम मध्ये तसे फीड केले आहे. जास्त बिल जरी आले ते पुढील महिन्यात आपोआप वजा केले जातील. ग्राहकांनी सहकार्य करावे.
विलास पवार, कनिष्ठ अभियंता, उपनगर विज कार्यालय

- Advertisment -

ताज्या बातम्या