नाशिककरांनी अधिक काळजी घेण्याची गरज; घराबाहेर पडू नका अन्यथा कडक कारवाई

नाशिककरांनी अधिक काळजी घेण्याची गरज; घराबाहेर पडू नका अन्यथा कडक कारवाई

नाशिक : जिल्हात कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर गेली असुन यातील एकाचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्यात खळबळ उडाली असून नाशिककरांनी आता अधिक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच पोलीस करत आहेत. परंतु तरिही अनेक नागरीक याचे गांभिर्य न अोळखता काही कारण दाखवून घराबाहेर पडत आहेत. अशांवर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केले असून कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

नाही नाही म्हणता नाशिक शहर तसेच जिल्हयात करोनाचा कहर सुरु झाला आहे. दुसरीकडे बोटे दाखवताना हे संकट आपले दार केव्हा ठोठावयास लागले हे अपणास कळलेच नाही. यावर अद्याप तरी कसलेही अौषध नाही. इतरांचा संपर्क टाळून घरात सुरक्षित बसणे हाच त्यावर प्रभावी प्रतिबंध आहे.

यासाठी २० मार्च पासून जिल्हा प्रशासन व पोलीस जनजागृती करत आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तुंसाठी मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेत अनेकजन विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशांना समजाऊन सागून तसेच दंडुक्यांचा प्रसाद देऊनही फारसा परिणाम होताना दिसत नाही. पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा नागरीक विविध कारणे सांगत रस्त्यावर येत अाहेत.

अशी कृती करणारे नागरी स्वत:सह त्याचे कुटुंबिय तसेच इतर समाजासाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे अशांचा उपद्रव रोखण्यासाठी पोलिसांनी आता प्रत्येक भागातील मुख्य चौक तसेच काँलनी, गल्लींमधे बँरेकेटिंग लावून सील करण्यास सुरुवात केली आहे.

घराबाहेर पडणार्‍या व्यक्तीचे काम अत्यावश्यक आहे का?, त्याने परवानगी घेतली आहे का ? याची चौकशी केली जात आहे. असे नसेल तर त्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. दुचाकी तसेच वाहनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहन बाळगणारांची वाहने जप्त केली जात आहेत. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जात आहे.

शहरात आतापर्यंत १ हजार ५०० जणांवर जमाबंदिचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सुमारे ५०० वाहने जप्त करण्यात आली आहेत. नागरीकांनी महत्वाचे कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अन्याथा कारवाईची तयारी ठेवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

कोरोना या विषाणूचा वाढता संसर्ग पाहता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कार्यरत आहेत. एक घराबाहेर पडणारी व्यक्ती शेकडोजणांना बाधित करू शकते. यामुळे घराबाहेर पडू नका. पोलीसही माणसेच आहेत. आतापर्यंत खुप विनंतीपुर्वक, समजाऊन पोलीस संगत आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. घराबाहेर पडू नका
– अमोल तांबे, पोलीस उपायुक्त

देशदूतचे आवाहन
शहरात एक करोना रुग्ण सापडल्यानंतर ३ किलोमिटर परिसर सील करण्यात आला आहे. हा धोका अगामी काही दिवसात उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. पोलिस आपल्या जीवाची परवा न करता आपल्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:सह आपले कुटुंब तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन देशदूत वृत्तपत्र समुहातर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com