लासलगावकरांची होणार कोरोना संसर्ग तपासणी : जि.प. आरोग्य विभाग

लासलगावकरांची होणार कोरोना संसर्ग तपासणी : जि.प. आरोग्य विभाग

नाशिक । लासलगावमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन ऍक्शनमोडमध्ये असून लासलगावमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. जिल्हा परीषद आरोग्य विभागाकडून २० टीम तयार करण्यात आली असून त्यात वैदयकीय अधिकारी व परिवेक्षक असणार आहे. करोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेउन त्यांचे नमुने तपासणीसाठि पाठवले जाणार आहे.

पिंपळगाव नजीक येथील ३० वर्षाच्या बेकरी व्यवसाय करणार्‍या तरुणाला करोना विषाणूचा संसर्गाची लागण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्याच्यावर उपचार सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात करोनाची ही पहिलीच केस असून लासलगावमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात आला असून त्यामुळे इतरांना करोनाचा संसर्गाची भिती आहे. ते बघता जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत लासलगावमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. रुग्ण ज्या गावात राहतो तेथील लोकसंख्या ६८०० इतकी आहे.

आरोग्य विभागाच्या एकूण २० टीम तयार करण्यात आल्या असून प्रत्येक टीम मध्ये चार सदस्यांचा समावेश आहे. त्यात आशा, अंगणवाडी कार्यकर्ती , आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असून प्रत्येक चार टीम मागे एक वैद्यकीय अधिकारी आणि परिवेक्षक असणार आहे . तसेच जिल्हास्तरावरील साथरोग नियंत्रण कक्षातील टीम सर्वेक्षणाचे सनियंत्रण करणार आहे.

या सर्वेक्षणातून श्‍वसनसंस्थेच्या आजाराच्या सर्व रुग्णांचा तपासणी करण्यात येणार आहे. गरज असलेल्या रुग्णांना योग्य तो उपचार करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत विभागामार्फत ऐपो क्लोराइड सोल्युशन गावातील मुख्य रस्त्यांवर गर्दीच्या ठिकाणी बस स्टॅन्ड वर फवारणी करण्यात येणार आहे. याचे संनियंत्रण गटविकास अधिकारी निफाड हे करणार आहेत

१४ दिवस केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात तीव्र श्‍वसनसंस्थेच्या आजाराची ची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णास जिल्हास्तरावर विलगीकरण कक्षामध्ये इलाजासाठी बोलावून घशाच्या स्त्रावाचा नमुना घेण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाला सहकार्य करा.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com