त्र्यंबकेश्वर : अंबोली परिसरातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही : डॉ. योगेश मोरे
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : अंबोली परिसरातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही : डॉ. योगेश मोरे

Gokul Pawar

वेळुंजे : तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेवकाचा करोनाने मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परंतू तो आरोग्य सेवक गाव तसेच इतर कोणत्याही ठिकाणी संपर्कात आला नसून नागरीकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी केले आहे.

दरम्यान नाशिक येथील समता नगर येथे राहणारा आरोग्य सेवक हा अंबोली येथे रुजू झाला होता. परंतु एक अवघ्या काही तासच या ठिकाणी तो थांबला होता. त्यास त्रास जाणवू लागल्याने तो समता नगर येथे राहत्या ठिकाणी वास्तव्यास गेला. त्यानंतर पंधरा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी या आरोग्य सेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेत या संदर्भात माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की सदर कर्मचारी हा गावात अथवा परिसरात कुठेही फिरलेला नाही. जनतेच्या मनात यामुळे भितीचे वातावरण पसरलेले आहे. त्या आरोग्य सेवकाच्या संपर्कात काही लोक आले असतील त्यांची सखोल माहीती घेण्यात येत आहे. याबद्दल येथील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

गावातील किंवा परिसरातील लोकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता अफवावरती विश्वास ठेवू नये. मयत झालेला आरोग्य कर्मचारी हा गेल्या १४ दिवसापूर्वी रुजू होण्यासाठी आला होता. परंतु तो या ठिकाणी केवळ दहा मिनिट थांबून निघून गेला. त्यामुळे त्याच्याशी कोणत्याही व्यक्तीचा संबंध आलेला नाही.
तसेच या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून अगोदरच प्रतिबंधक उपाय योजना आखल्या होत्या व अजूनही त्या आहेत.
– डॉ.योगेश मोरे, वैदयकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र आंबोली

Deshdoot
www.deshdoot.com