मुख्यमंत्री ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचा पहिला पूर्णाकृती फोटो भेट
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचा पहिला पूर्णाकृती फोटो भेट

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा पहिला पूर्णाकृती फोटोग्राफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिला.

दरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे दीक्षांत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशकात होते. ओझर (दि. २९ ) रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर असताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट घेत हा फोटोग्राफ भेट दिला.


जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जुनी असून आजही ती सुस्थितीत उभी आहे. या इमारतीला लागूनच मुख्य रस्ता असल्याने आणि मध्ये झाडे असल्यामुळे असा फोटोग्राफ थेट काढता येत नाही. अनेक वेगवेगळ्या अँगलने शेकडो फोटो काढून ते फोटोशॉप करून मूळ इमारतीचे हुबेहूब चित्रीकरण त्याद्वारे करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यंत अत्यंत कुतूहलाने फोटोग्राफ पाहून त्याची वैशिष्ट्ये समजावून घेतली. त्याच सोबत मा मुख्यमंत्री यांना आदरणीय कुसुमाग्रज यांची फोटोबायोग्राफी भेट दिली.

Deshdoot
www.deshdoot.com