Thursday, April 25, 2024
Homeनाशिककरोना’ नंतर मनोरंजक सृष्टीत उलथा पालथ होणार; कलाकारांसमोर आव्हाने

करोना’ नंतर मनोरंजक सृष्टीत उलथा पालथ होणार; कलाकारांसमोर आव्हाने

नाशिक | नील कुलकर्णी
करोना रोग हद्दपार झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात विशेषतः चित्रपटसृष्टीत प्रचंड उलथापालथ, स्थित्यंतरे होणार असून कलाकारांसमोरील आव्हाने वाढणार आहेत. करोना स्थितीतून चित्रपट उद्योगाला सावरण्यास किमान 3 वर्षे लागतील. मात्र इष्टापत्ती म्हणून कलाकारांच्या सर्जनाला सुंदर धुमारे फुटतील आणि चौकटी बाहेरील सर्जकता बाहेर येऊन त्याचे रूप, रंग यामध्ये कमालीचे बदल दिसतील असा सूर नाशिकच्या कलावंतांनी ‘देशदूत’ शी बोलताना व्यक्त केला.

चित्रपटसृष्टीत भयाण’ वळणावर
‘करोना’ संपल्यानंतरही चित्रपट उद्योगात दूरगामी वाईट परिणाम दिसतील. नोकऱ्या कमी होतील, तेव्हा लोक पोटाचा प्रश्न सोडवण्यात अडकल्यावर चित्रपट कसे बघतील. एकूणच परिस्थिती गंभीर होईल, ‘करोना’संपल्यानंतर वेबसीरीज सारख्या माध्यमातून मनोरंजन अधिक वाढेल. मात्र चित्रपट हा समूहाने निर्माण करण्याची गोष्ट असल्याने मोठे प्रस्थापित कलाकार वगळता छोटे कलावंत पूर्णपणे खचतील, ही मरगळ दूर होऊन हा उद्योग उभा रहायला किमान 3 वर्ष लागतील.
– सुहास भोसले, दिग्दर्शक.

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टी फटका
‘करोना’ परिस्थिती नंतर मोठे कलाकार सोडले तर बाकीच्या कलावंताचा भाकरीचा प्रश्न अतिगंभीर होईल. मराठी सिने जगत ‘डेली सोप्स’वर खूप अवलंबून आहे. या परिस्थितीचा फटका त्यांना बसणार. मालिका बंद झाल्याने छोटे कलाकार, मेकअप आर्टिस्ट, कमॅरा, लाईटवाले आणि इतर संबंधीत लोकांचे जीवन खूप बदलून जाणार आहे.
-सचिन शिंदे, दिग्दर्शक.

सर्जनशिलतेने नवे प्रयोग होतील
कलाकार जेव्हा ‘कम्फर्ट’ झोनमधून बाहेर येतो तेव्हा चौकटीच्या बाहेरील विचार करतो, करोना आपत्तीमुळे थिएटर नवे रूप, रंग धारण करेल. त्यामध्ये नवे सर्जनशील प्रयोग होतील. केवळ चित्रपटच नव्हे तर एकूणच थिएटर, मनोरंजन जगत नवे रूप धारण करेल अर्थात आव्हाने वाढतील. पण प्रत्येक समस्या, संकटे, प्रतिकुलता यातून इष्ट घडतेच, नवा विचार,सर्जन जन्म घेतेच. मात्र मनोरंजक, अभिव्यक्त होणे ही मनुष्याची मोठी गरज आहे त्यामुळेच ही सृष्टी संक्रमणातून पुन्हा वर येईल.
-प्रविण काळोखे, नाट्य दिग्दर्शक.

- Advertisment -

ताज्या बातम्या