नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना केंद्राचे अंतरिक सुरक्षा सेवा मेडल जाहिर

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक : नाशिकचे माजी पोलीस आयुक्त तथा अौरंगाबादचे विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्रकुमार सिंगल यांना केंद्र शासनाचा अंतरिक सुरक्षा सेवा मेडल जाहिर झाले आहे.

आज पोलीस महासंचालकांनी याबाबतचे पत्र सबंधीत अधिकार्‍यांना पाठवले आहे. राज्यातील १ हजार १७२ अधिकार्‍यांचा यामध्ये सामावेश आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर , भंडारा अशा नक्षलग्रस्त भागात किमान ३ वर्ष सेवा करणार्‍या अधिकार्‍यांना हे पुरस्कार देण्यात येतात.

रविंद्रकुमार सिंगल यांनी या भागात ३ वर्ष काम केल्याने त्यांनाही हे मेडल जाहिर झाले आहे. सिंगल यांनी २००४ मध्ये नाशिकचे पोलीस अधिक्षक तर २०१९ पर्यंत पोलीस आयुक्त म्हणुन काम केले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share This Article