सीबीएस, मेहेरसिग्नलवर आता सीसीटीव्हीची नजर
स्थानिक बातम्या

सीबीएस, मेहेरसिग्नलवर आता सीसीटीव्हीची नजर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । शहरातील अशोक स्तंभ वगळता स्मार्टरोडचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या रोडवरील सिग्नलवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी आज पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासह स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकार्यांनी पाहणी केली.

स्मार्टरोडवरील सीबीएस आणि मेहेर चौकातील रस्त्याचे काम पूर्ण झाले हे चौक वाहतुकीसाठी नुकतेच खुले करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम करताना येथील सिग्नल यंत्रणा हटविण्यात आली होती. हे सिग्नल नव्याने उभारण्यात येणार आहेत. आधुनिक असलेल्या सिग्नल यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहे. या कॅमेर्यांची स्थिती काय असावी, जास्तीत जास्त वाहने आणि परिसर त्याच्या कक्षेत येेऊ शकेल याची पाहणी शनिवारी करण्यात आली. सीबीएससह मेहर परिसरात प्रवाशांची सुद्धा मोठी वर्दळ असते.

या ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. आगामी 15 दिवसांत म्हणजे 7 डिसेंबरपर्यंत सिग्नल्ससह सीसीटीव्ही कार्यन्वीत होतील, असे चौगुले यांनी स्पष्ट केले. परिणामी शहरातील बेशिस्त वाहतुक करणार्या वाहनचालकांना वाहतुकीचा नियम मोडताच परस्पर दंड ई चलानद्वारे केला जाणार आहे. यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यास तसेच गुन्हेगारी कारवायांना आपोआप आळा बसणार आहे.

शहरात इतर ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. या पाहणीवेळी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आंनद वाघ, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार, स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com