Thursday, April 25, 2024
Homeनाशिक15 फेब्रुवारीपासून सीबीएस-मेहेर सिग्नल होणार लाईव्ह

15 फेब्रुवारीपासून सीबीएस-मेहेर सिग्नल होणार लाईव्ह

नाशिक । महानगरपालिका व शहर पोलीस यांच्या संयुक्तविद्यमाने स्मार्ट सिटी अंतर्गत महाआयटीकडून होत असलल्या 160 कोटींच्या सीसीटीव्ही आणि कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुम या प्रकल्पांतर्गत सुरक्षितता आणि वाहतुकीला शिस्त लागावी याउद्देशाने येत्या 15 फेब्रुवारीपासून शहरातील सीबीएस आणि मेहेर सिग्नल बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमला जोडण्यात येऊन त्यांचे प्रत्यक्ष रेकॉर्डींग अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे लाईव्ह होणार आहे. यामुळे आता वाहतूक शिस्त मोडणार्‍यांवर या कॅमेर्‍याद्वारे ऑन लाईन दंडात्मक कारवाई करण्याची तयारी शहर पोलिसांकडून सुरू झाली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीकडून पहिल्या टप्प्यात मे महिन्यात शहरातील प्रमुख ठिकाणी अर्थात सिग्नल्स व गर्दीचे चौक अशा ठिकाणी 800 सीसीटीव्ही कॅमरे कार्यान्वीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीकडून सध्या सीबीएस चौक व मेहेर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर ते कंपनी कार्यालयातील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमला जोडण्यात आले आहे. सध्या या दोन चौकातील कॅमेरे ते कंट्रोल रुमपर्यंत स्थापित करण्याचे काम सुरू असून याअंतर्गत कंट्रोल रुममध्ये लाईव्ह संदर्भातील चाचणी सुरू झाली आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात सीसीटीव्ही बसवण्यात आलेल्या दोन्ही चौकात उच्च गुणवत्तेचे कॅमेरे लावण्यात आले असून ये जा करणार्‍या वाहनांचे नंबर व्यवस्थित रेकॉर्ड होत असून शिस्त मोडणार्‍या वाहनधारकांना तत्काळ ऑन लाईन स्वरुपात दंडाची कारवाई करणे शक्यता होणार आहे. तसेच पायी अथवा वाहनावरुन ये जा करणार्‍या व्यक्ती ओळखता येईल अशापध्दतीने हे कॅमेरे लावण्यात आले आहे. याठिकाणी कोणी गुन्हा करून पळाला अथवा काही दुर्घटना घडल्यास पोलिसांना काही मिनिटात याठिकाणी जाऊन कारवाई अथवा मदत पोहचवता येणे शक्य होणार आहे.

अशाप्रकारे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुममध्ये चाचणीचे काम सुरू झाले असुन येत्या 15 फेब्रुवारीपासून सीबीएस व मेहेर सिग्नलचे सीसीटीव्ही कॅमेरे लाईव्ह होऊन याचे रेकॉर्डींग शहर पोलीसांच्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमला जोडले जाऊन त्यांच्या अधिपत्याखाली होणार आहे.

पहिल्या टप्प्यात शहरात बसणार 800 कॅमेरे
शहरातील सीसीटीव्ही व कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुम हा प्रकल्प 160 कोटींचा असुन याकरिता निम्मा निधी गृह विभागाकडून मिळणार आहे. स्मार्ट सिटीच्या प्लॅनमध्ये शहरात 3200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला तरी तयार करण्यात येत असलेले कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुममधुन 4000 सीसीटीव्ही बसविण्याची क्षमता आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीकडून शहराच्या प्रमुख भागात 800 कॅमेरे बसविण्याचे काम सुरू

- Advertisment -

ताज्या बातम्या