सिन्नर : सहा दिवसांत २१ टन मांस अन २४ जनावरांची वाहतूक; वावी पोलिसांकडून कारवाई

सिन्नर : सहा दिवसांत २१ टन मांस अन २४ जनावरांची वाहतूक; वावी पोलिसांकडून कारवाई

सिन्नर : पुणे महामार्गावरून भाजीपाला भरलेल्या वाहनांमधून जनावरांच्या मांसाची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चौथ्यांदा उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि.१४) रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. या कारवाईत वावी पोलिसांनी ट्रकसह ५ टन मांस जप्त केले असून, दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावर मंगळवारी (दि.१४) रात्री नऊ च्या सुमारास नांदूरशिंगोटे येथे जिल्हा सीमेवरील नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी सुरू असताना ५ टन जनावरांचे मांस वाहून नेणारा आयशर पकडण्यात आला. या कारवाई पाच लाख रुपये किमतीच्या मांसासह ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई सुधाकर चव्हाणके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इक्बाल अब्दुल रहमान खान (२९), अहसान महम्मद कुरेशी (२२) रा. कसाईवाडा, कुर्ला, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोघे आयशर ट्रक क्र. एमएच ०४ ऐ क्यू ७६२६ मध्ये कोबीचे गड्डे व त्याखाली जनावरांचे मांस भरून संगमनेर कडून निमोण मार्गे मुंबईच्या दिशेने निघाले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सहायक निरीक्षक रणजित लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. अढांगळे, पी. सी. भांगरे पुढील तपास करीत आहेत.

नगर जिल्हयातून येतात वाहने

देशात सर्वत्र संचारबंदी व लाँकडाऊन असतानांही राजरोसपणे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर भागातून जनावरांचे मांस घेऊन जाणारे आयशर टेम्पो नाशिक जिल्ह्याच्या नाकाबंदी पकडण्यात येत आहेत.

गेल्या सहा दिवसांत २१ टन जनावरांचे मांस आणि २४ जिवंत जनावरे पकडण्यात आली आहेत. संचारबंदी असतानाही संगमनेर भागातून मांसाचे ट्रक कशाप्रकारे येतात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच व्यक्तिगत लक्ष घालावे आणि संगमनेर तालुक्यातील कथित कट्टलखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com