सिन्नर : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

सिन्नर : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : दोन समाजात तेढ निर्माण करणारा संदेश सोशल मीडियावर पसरविल्याप्रकरणी सिन्नर तालुक्यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर कैलास पिंपळे, अजय नवनाथ डुंबरे (रा. धनगरवाडी, पिंपळगाव, ता. सिन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गौरव रघुनाथ सानप यांनी फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार, संशयित पिंपळे याने त्याच्या व्हॉटस्‌अँप क्रमांकावरून एका समाजाविषयी अश्‍लिल भाषेत संदेश त्यांच्या स्टेटस्‌वरून व्हायरल केला होता. संशयित अजय डुंबरे याने त्याच्या स्टेटस्‌चे स्क्रिन शॉट काढून ते व्हायरल केले.

या संदेशातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संशयितांनी केल्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. दपोलीस उपनिरीक्षक जी.पी. लावणे अधिक तपास करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com