दिंडोरी : गोपनीय माहितीचा मॅसेज व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

दिंडोरी : शहराच्या पोलीस निरीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेला मॅसेज व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तथापि मॅसेज कोणत्या अधिकाऱ्याने दिला याचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे.

याबाबत माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील अधिकाऱ्यांचा कोरोना फाईट २०२० या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपवर पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांनी प्रांत अधिकारी संदीप आहेर यांना दैनंदिन कामाचा भाग म्हणून दिंडोरी तालुक्यातील एका गावाशी संबंध असलेल्या करोना संसर्ग असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्तीना क्वारंटाईन केल्याची माहिती नावासह दिली होती. पण ही माहिती या ग्रुपवरून कोणीतरी व्हायरल केली.

ननाशी येथील नया जीवन ननाशी व्हॉट्सअप ग्रुप, अडमिंन अप्पा शिंगाडे, अजितदादा मित्रमंडळ आंबेगण, ग्रुप सदस्य संतोष लोखंडे व संतोष डोमे यांच्याकडून ती माहिती प्रसारित झाली. सदर माहिती संबंधित कर्मचाऱ्याने वाचली. त्यांनतर त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

इतरांना करोनाची लागण झाली असा समज सर्वांना झाल्याने गावपातळीवर भीतीचे वातावरण तयार झाले आहे, अशी तक्रार सरकारी कर्मचाऱ्याने दिंडोरी पोलिसाकडे केल्याने पोलीस हवालदार धनंजय शिलावटे यांनी तिघांविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात अफवा पसरवल्याचा गून्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *