लोहशिंगवे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
स्थानिक बातम्या

लोहशिंगवे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : भगूर जवळील लोहशिंगवे गावातील वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे.

लोहशिंगवे येथील जुन्द्रे वस्तीवर पहाटेच्या सुमारास सुरेश दत्तू जुन्द्रे यांच्या गोठयात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात वासरू जागीच ठार झाले.

सकाळी सहा वाजेला येथील सरपंच संतोष जुन्द्रे यांनी वनविभागास घटनेची माहिती दिली असून तपास कार्य चालु आहे.

Deshdoot
www.deshdoot.com