गंगापूर रोड : पोलीस आयुक्त कार्यालयाजवळच ५१ लाखांची धाडसी चोरी
स्थानिक बातम्या

गंगापूर रोड : पोलीस आयुक्त कार्यालयाजवळच ५१ लाखांची धाडसी चोरी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : के.टी.एच.एम कॉलेज शेजारील लुथरा यांच्या घरातून चोरटयांनी तब्बल ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

दरम्यान सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात हि घटना घडली. काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास लुथरा कुटुंबीय बाहेर कामानिमित्त गेले असता गेले असता चोरटयांनी हात साफ केला.

यामध्ये ५० लाख रुपयांचे दागिने आणि १ लाख रुपये कॅश असा एकूण ५१ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com