सिन्नर : पतंग उडवताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

सिन्नर : पतंग उडवताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

Gokul Pawar

नाशिक : सिन्नर येथील संत हरीबाबा नगरमध्ये पतंग उडवताना विहरीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

भैरवनाथ सोसायटी परिसरातील मोकळ्या जागेत सकाळी साडे दहावाजेच्या सुमारास काही मुले पतंग उडवीत होती. पतंगामागे धावतांना आर्यन व त्याचा मित्र जवळच्या विहिरीत पडले. यावेळी इतर मुलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावले. आर्यन पाण्यात बुडाल्याने त्याला वाचवण्यात अपयश आले तर त्याच्या मित्राला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या घटनेने सिन्नर परिसरात खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com