मद्य प्राशन करून धिंगाणा घालणारे दोघेही पोलीस अखेर निलंबित

नवीन नाशिक प्रतिनिधी : मद्य प्राशन करून अपघातास करून, तेथील नागरिकांशी हुज्जत घालून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ‘त्या’ दोन पोलीस कर्मचारी बंधूंचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी निलंबन केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , लेखानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या बंगल्यासमोर रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या पोलीस सेवकांचे निलंबन करण्यात आले आहे.

सदर घटना झाल्यावर या पोलीस सेवकाने पोलीस भावास बोलावून उपस्थित वाहन मालकास व भांडण सोडविण्यास जाणाऱ्या एका युवकास जबर मारहाण करून घटनास्थळी उपस्थित गौळणे गाव सरपंच अजिंक्य चुंभळे यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलीस सेवक सागर हजारे व मयुर हजारे या दोन पोलीस भावंडास निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या कडक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वागत होत आहे.

यापूर्वी देखील सागर हजारे यांनी अशाच प्रकारे हुज्जत घातल्याने त्यांचे निलंबन झाल्याचे समजले तर हजारे कुटुंबातील पाच ते सहाजण पोलीस खात्यात असतानाही त्यांनी अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणे हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com