Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहरातील दोन्ही नोट प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंदच राहणार

शहरातील दोन्ही नोट प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंदच राहणार

नाशिकरोड : राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढवल्याने आय.एस.पी. मजदुर संघाने आय.एस.पी व सी.एन.पी. प्रशासनाशी काल चर्चा केली.

याबाबत झालेल्या बैठकीत दोन्ही चिफ जनरल मँनेजर यांना आपल्या काही मागण्यांचे पत्र सादर केल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

- Advertisement -

दोन्ही प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंद राहतील. तसेच केंद्र सरकार व एस.पी.एम.सी.आय.एल.मँनेजट यांचे निर्देशानुसार काही तातडीचे काम करुन द्यावे लागल्यास केवळ ठराविक कामगाराना कामावर बोलावुन सदर कामाची पुर्तता करून देण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

तसेच महानगर पालिकेच्या धर्तीवर आय.एस.पी./सी.एन.पी.मधील सर्व गेटवर सॅनिटायजर कक्ष नाशिक बसविण्यात यावे, अशी मागणी मजदूर संघाने केली. याशिवाय तातडीच्या कामासाठी बोलविण्यात येणाऱ्या सर्व कामगारांना मास्क, हँन्ड ग्लोव्हज देण्यात यावेत. तसेच त्यांचा कामाचा परिसर निर्जंतुक करण्यात यावा.

सदर कामगारांना कामावर येण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची परवानगी घेण्यात यावी. त्यासाठी कामगारांना येण्या-जाण्यासाठी पत्र द्यावे. यासह कामगारांच्या सुरक्षेत कसलीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तातडीच्या कामासाठी बोलविन्यात येणाऱ्या कामगारांना सोशल मिडिया मार्फत कळविले जाईल.

तसेच ज्या कामगारांची मुले अथवा मुली मुंबई-पुणे येथे शिक्षणासाठी गेली होती व आता ते घरी आले असतील त्यांनी जास्त काळजी घ्यावी. घराबाहेर पडु नये. दरम्यानच्या काळात पुन्हा काही नवीन निर्णय झाला तर तो निर्णय सर्वांना कळविण्यात येईल, असेही बैठकीत ठरण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या