शिवरायांना अनोखे अभिवादन; रक्ताने रेखाटले जिजाऊ, शिवबाचे चित्र
स्थानिक बातम्या

शिवरायांना अनोखे अभिवादन; रक्ताने रेखाटले जिजाऊ, शिवबाचे चित्र

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कॅम्प । कलावंत व त्याच्या छंदाला धर्म, जातपात अशा बाबींचे बंधन नसते. झपाटलेपणातूनच इतिहास घडतो, हे वास्तव सत्य असल्याची प्रचिती संतोष कटारे या अवलियाकडे बघून येते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष असलेल्या कटारे यांनी स्वत:च्या रक्ताने जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र रेखाटून त्याचे फलक शहरात लावल्याने जाणकारांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

कटारे हे मुळातच चित्रकार असून जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. सामाजिक चळवळीत काम करताना त्यांना चित्रकलेचे वेड गप्प बसू देत नाही हे त्यांच्या व्यासंगातून दिसते. कला जोपासताना वेगळे काही करण्याकडे त्यांचा नेहमी कल असतो. आज होणार्‍या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या रक्ताने चितारलेले जिजाऊ व शिवाजी महाराजांची चित्रे शहरात लावून एकप्रकारे अभिनव अभिवादन केले आहे.

कटारे यांनी यापूर्वीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महमंद पैगंबर, अण्णा भाऊ साठे, गुरू गोविंदसिंग यांचे चित्र रक्ताने रेखाटले आहेत. त्यांच्या उपक्रमाचे परिसरातील आबालवृद्ध जाणकारांकडून कौतुक होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com