भाजप नगरसेवकांचे दहा लाख रुपयांचे वेतन पक्ष फंडमध्ये जमा

भाजप नगरसेवकांचे दहा लाख रुपयांचे वेतन पक्ष फंडमध्ये जमा

नाशिक : करोना संकटात भारतीय जनता पक्षाच्य‍ा नगरसेवकांनी महाराष्ट्र धर्माऐवजी पक्षाच्या चरणी निष्ठा अर्पण केली असून मुख्यमंत्री सहायता निधीऐवजी पक्षाच्या आपदा कोशमध्ये आर्थिक मदत जमा केली आहे. भाजप नगरसेवकांनी त्यांचे एप्रिल महिन्याचे दहा लाख ५ हजाराचे वेतन पक्षाकडे जमा केले अाहे.

करोना संकटाशी दोन हात करण्यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. राज्याच्या तिजोरित पैसे नसल्याने दानशुरांनी सीएम फंडमध्ये आर्थिक मदत जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते.

राजकीय पक्ष, उद्योजक, व्यावसायिक, सामान्य लोक त्यांच्यापरीने सीएम फंडमध्ये मदत जमा करत आहे. असे असताना भारतीय जनता पक्षाने पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी यांनी पक्षाच्या आपदा कोशमध्ये मदत जमा करावी असे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सीएम फंडऐवजी पक्षाच्या फंडमध्ये मदत जमा करा, असे सांगितले आहे.

त्यानूसार नाशिक महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी त्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकूण दहा लाख पाच हजार रुपये सीएम फंडऐवजी पक्षाच्या आपदा कोशमध्ये जमा केले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी हा धनादेश पक्षाचे शहराध्यक्ष गिरिश पालवे यांच्याकडे सपूर्द केला.

यावेळी उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, माजी स्थायी समिती समिती अध्यक्ष संजय बागुल, माजी नगरसेवक यशवंत निकुळे उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप नगरसेवकांचे वेतन दहा लाख रुपये पक्षाच्या आपदा कोशमध्ये जमा केले आहे. करोना संकटात पक्षाकडून गोरगरिबांना विविध प्रकारची मदत दिली जात आहे.
– गिरिश पालवे, शहराध्यक्ष
भाजप

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com