दिंडोरी : चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खुन
स्थानिक बातम्या

दिंडोरी : चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खुन

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब शिवारातील येथील जुना जांबुटके रस्ता वाघोबा मळा येथे चारित्राच्या संशयावरून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खुन करण्याची घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार कैलास वडजे (वय ३०) व संशयीत गोटीराम उर्फ सुनील वडजे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादात गोटीरामने कैलास यास लोखंडी गजाने मारहाण केली. कैलास यास जबर मार लागल्यानंतर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू रक्तस्राव अधिक होत असल्याने त्यास तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान कैलास याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

सदर मारहान करणारा संशयित गोटीराम (वय ३२) रा मडकीजांब यांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे करित आहे .

Deshdoot
www.deshdoot.com