त्र्यंबकेश्वर ते पालघर रस्ता अधिक मजबूत होणार; खा गोडसेंच्या हस्ते भूमिपूजन

त्र्यंबकेश्वर ते पालघर रस्ता अधिक मजबूत होणार; खा गोडसेंच्या हस्ते भूमिपूजन

त्र्यंबकेश्वर : सिन्नर ते मनोर पालघर या राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत पेगलवाडी फाटा ते जिल्हा हद्द या रस्त्याच्या
मजबुती करण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांचे शुभहस्ते भूमिपूजन झाले.

गुजरात मार्ग व पालघर त्र्यंबकेश्वर ही वहातुक वाढलेली यात मालवाहतूक जास्त वाढली असल्याने हा रस्ता नुतनीकरण मजबुतीकरण साठी खा हेमंत गोडसे यांनी केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी याचे कडे पाठवपूरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून ११२८ लक्ष या रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या कामातून व्यापार वाहतुकीला चालना मिळणार असल्याचे खा गोडसे यांनी सांगितले.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर तसेच
शिवसेना तालुका पदाधिकारी संपत चव्हाण, रवी वारुंगसे, समाधान बोडके, सचिन दीक्षित, विनायक माळेकर इ सह महामार्ग विकास नाशिकचे कार्यकारी अभियंता व्ही बी
माळूणदे, उपअभियंता मनोज पाटील, शाखा अभियंता एस टी बडगुजर, एन एम खेडकर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com