विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे लवकरच भूमिपुजन
स्थानिक बातम्या

विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे लवकरच भूमिपुजन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रा बांधकामाचे पुढील दोन महिन्यात भूमिपुजन करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे बांधकाम आणि इतर समस्यांसंदर्भात त्यांनी शनिवारी (दि. 11) विद्यापीठात बैठक घेतली. त्यावेळी ही माहिती दिली.

पुणे विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिनेट सदस्य अमित पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबधित अधिकार्‍यांना सूचना देखील दिल्या होत्या. त्यानंतर शनिवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेत विद्यापीठ प्रशासनासोबत चर्चा केली. कामाला गती देण्यासाठी शासन आदेश काढण्याची गरज कुलगुरू नितीन करमाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रकरणी पंधरा दिवसात शासन आदेश काढून दोन महिन्यात बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे सामंत यांनी जाहीर केले. बैठकीस प्र-कुलगुरू उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक माने, सिनेट सदस्य अमित पाटील व अधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com